IRCTC चं श्रावण स्पेशल टुर पॅकेज; ‘या’ तीर्थक्षेत्रांना स्वस्तात भेट देण्याची सुवर्णसंधी

IRCTC Travel Plan | पवित्र श्रावण महिना आता सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेला आणि दर्शनाला अत्यंत महत्व आहे. कारण भगवान शंकरांना श्रावण महिना खूप प्रिय आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या महिन्यात भाविक अनेक ठिकाणी दर्शनाला जात असतात. या महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या जातात.

अशात भारतीय रेल्वेने श्रावण स्पेशल एक टुर पॅकेज आणलं आहे. यामध्ये तुम्हाला तीर्थक्षेत्रांना स्वस्तात भेट देण्याची सुवर्णसंधी असणार आहे. या काळात कुटुंबियांना आपल्या मुलांना धार्मिक सहलीवर घेऊन जाता येणार आहे. तुम्हालाही श्रावण महिन्यात विविध तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची असले तर, भारतीय रेल्वे तुम्हाला (IRCTC Travel Plan) सुवर्णसंधी देत आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊयात..

रामेश्वरम टूर पॅकेज

IRCTC चे हे 1 दिवसाचे टुर पॅकेज आहे. येत्या 12 ऑगस्टपासून मदुराई येथून त्याची सुरुवात होणार आहे. यामध्ये तुम्हाला कॅबने प्रवास करायला लावला जाईल. या पॅकेज अंतर्गत दोन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 6200 रुपये आहे.तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 4150 रुपये आहे. तर, मुलांसाठी 1550 रुपये फिस आहे. यामध्ये तुम्हाला खाद्यपदार्थ आणि हॉटेल सुविधा उपलब्ध होणार नाहीत, कारण  (IRCTC Travel Plan)पॅकेज फक्त एका दिवसासाठी आहे.

जम्मू/कटरा टूर पॅकेज

हे टुर पॅकेज 3 रात्री 4 दिवसांचे आहे. त्याची सुरुवात 11 ऑगस्टपासून दिल्लीतून होत आहे. पॅकेज फी – दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7855 रुपये आहे.तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 6795 रुपये आहे. तर, मुलांसाठी 6160 रुपये फिस आहे. पॅकेजमध्ये जेवण आणि हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता. (IRCTC Travel Plan)

चेन्नई/कन्याकुमारी/मदुराई टूर पॅकेज

हे टुर पॅकेज एकूण 6 रात्री 7 दिवसांचे असणार आहे. त्याची 28 ऑगस्टपासून दिल्लीतून सुरुवात होत आहे.  दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 54,640 रुपये आहे. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 52,700 रुपये आहे. तर, मुलांसाठी पॅकेज फी 41,880 रुपये ठेवण्यात आली आहे. पॅकेजमध्ये जेवण आणि हॉटेलच्या सुविधा उपलब्ध असेल. (IRCTC Travel Plan)

News Title –  IRCTC Travel Plan for Rameswaram Jammu Katra

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

वजनामुळे विनेश फोगाट ठरली अपात्र, जाणून घ्या काय आहे नियम? :

विनेश फोगाट विरोधात कारस्थान?, कुटुंबाकडून फेडरेशनवर गंभीर आरोप

टाटा कंपनी भन्नाट फीचर्ससह सादर करणार सेन्सर कार; किंमत असणार सर्वांच्या बजेटमध्ये

दिवंगत अभिनेता सुशांत सिंहबद्दल सारा अली खानचा खळबळजनक खुलासा!