IRCTC Travel Plan | श्रावण महिना आता काहीच दिवसांवर आला आहे. या महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेला आणि दर्शनाला अत्यंत महत्व आहे. कारण भगवान शंकरांना श्रावण महिना खूप प्रिय आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या महिन्यात भाविक अनेक ठिकाणी दर्शनाला जात असतात.
अनेक लोक श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरात जात असतात. श्रावणात भगवान शंकरांच्या ऐतिहासिक मंदिरांना भेट देण्याची तुमची जर इच्छा असेल आणि (IRCTC Travel Plan) बजेटमुळे तुमचं मन मागे-पुढे होत असेल तर, ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.
भारतीय रेल्वे तुम्हाला स्वस्तात प्रवासाची सुवर्ण संधी देत आहे. या लेखात तुम्हाला उज्जैन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन टूर पॅकेज आणि अनेक ऐतिहासिक मंदिर दर्शन पॅकेजबद्दल माहिती देण्यात आली आहे.
श्रावण महिन्यात अनेक ज्योतिर्लिंगे एकत्र पाहायची असतील, तर IRCTC तुमच्यासाठी एक पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही महाकालेश्वर, ओंकारेश्वर, नागेश्वर, सोमनाथ यासह (IRCTC Travel Plan) अनेक ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता. याबाबत खाली सविस्तर माहिती दिली आहे.
महाकालेश्वर-ओंकारेश्वर टूर पॅकेज-
5 रात्री आणि 6 दिवसांसाठीचे हे टुर पॅकेज आहे. यात तुम्ही दर शुक्रवारी पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकता. दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25000 आहे. मुलांसाठी पॅकेज फी 17300 रुपये आहे. यामध्ये हॉटेल, तिकीट, प्रेक्षणीय स्थळी बस आणि 5 दिवसांसाठी नाश्त्याची सुविधा (IRCTC Travel Plan) देखील आहे.
हरिद्वार टूर पॅकेज-
तुम्ही जर IRCTC पॅकेजने प्रवास केला तर, हरिद्वारसह तुम्हाला डेहराडून, मसुरी आणि ऋषिकेश येथेही नेले जाईल. हे पॅकेज 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 27810 आहे. मुलांसाठी पॅकेज फी 13795 रुपये आहे. यात तुम्हाला (IRCTC Travel Plan) हॉटेलमधून प्रवास करण्यासाठी बसची सुविधा मिळेल.
द्वारका-सोमनाथ टूर पॅकेज-
तुम्ही दर शुक्रवारी या पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकता. या पॅकेजमध्ये सोमनाथ दर्शनासोबत तुम्हाला द्वारकेचेही दर्शन दिले जाईल. या पॅकेजमध्ये ट्रेन आणि बसने प्रवास (IRCTC Travel Plan) करण्याची संधी मिळणार आहे. दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25000 आहे.मुलांसाठी पॅकेज फी 17300 रुपये आहे.
News Title – IRCTC Travel Plan Jyotirlinga
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर उद्या एखादा दहशतवादीही नाव बदलून भेटायला येईल”; सुप्रिया सुळे संतापल्या
“चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्या पेनड्राईव्हमध्ये, सगळं उघड..”; ‘या’ महिला नेत्याचा थेट इशारा
मराठा आंदोलकांचा ताफा थेट ‘मातोश्री’वर; अंबादास दानवे म्हणाले, ही भाजपची माणसं..
मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
रामदेव बाबांना हायकोर्टाचा दणका! ‘त्या’ प्रकरणी पतंजली आयुर्वेदला मोठा दंड