बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इरफान पठाणचा मोदींना टोला म्हणाला, ‘भविष्यात आशा आहे की…’

मुंबई | मोदी सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं असणार आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. त्यातच भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने केलेलं ट्विट आता चर्चेत आलं आहे.

इरफान पठाण याने मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हे पाऊल नक्कीच पुर्णपणे स्वागतार्ह आहे. पुरस्कार ज्याच्या नावावर आहे त्या खेळाडूचा त्यामुळे सन्मान होत असतो, असं इरफान म्हणाला. आशा आहे की, खेळांमध्ये अशा गोष्टी सुरू होतील, असंही तो म्हणाला. त्याचबरोबर त्याने आणखी ट्विट केलंय. त्यात त्याने मोदींवर खोचक टीका देखील केली आहे.

आशा आहे की भविष्यात देखील खेळाचे स्टेडियम खेळाडूंच्या नावे असतील, असा टोला इरफान पठाणने लगावला आहे. त्याचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या स्डेटियमला नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर मोदींवर प्रचंड टीका झाली होती.

दरम्यान, राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय?, अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमला सुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचं नाव देता आलं असतं, असं म्हणत नाना पटोले यांनीही मोदींवर निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या-

“तापलेल्या तव्यावर स्वत:ची चपाती भाजण्याची सवय भाजपने बदलावी”

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आदर पुनावाला यांची मोठी घोषणा, म्हणाले…

“खात्यात 15 लाख आले, युवकांना नोकऱ्या मिळाल्या, भारत विश्व गुरू बनला म्हणूनच मोदी….”

“लहान भाऊ म्हणून चंद्रकांत पाटलांना विनंती आहे की, मानसोपचार तज्ज्ञाला दाखवा”

“मोदींनीही सांगितलंय जान है तो जहान है, त्यामुळे महामारीत राजकारण करू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More