जळगाव महाराष्ट्र

…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे- गिरीश महाजन

जळगाव | भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

माझ्यावर केलेल्या आरोपांपैकी एक टक्का जरी गोष्ट खरी असेल तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. ही घटना शंभर टक्के खोटी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याची चौकशी करावी, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.

तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याची त्यांनी आता तक्रार केली. हा गुन्हा पुण्यात घडला. मात्र याप्रकरणी त्यांनी तक्रार मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर निंभोरा पोलीस स्टेशनला केली. तिथून ते झिरो नंबरने पुण्याला आले. मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, त्यांनी आत्मीयता दाखवली. साहेब आमच्यावर प्रेशर आहे. काय करायचं अशाप्रकारची तक्रार आहे, त्यावर मी गुन्हा नोंद करायला सांगितला, असं महाजन यांनी सांगितलं.

अतिशय बनवाबनवी चालली आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. अ‍ॅड. पाटलांचा बोलाचा धनी कोण ते सर्व जळगावकरांना माहिती आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

पाटलांच्या गावात सोयीची आघाडी! भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी

कौतुकास्पद! अंधत्वावर मात करत लताने केलं कळसूबाई शिखर सर

“आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चं नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो”

कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही- आरोग्य मंत्रालय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या