बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुग्णवाहिका नाही म्हणून चक्क कचऱ्याच्या गाडीतून नेला मृतदेह; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

धुळे | महाराष्ट्रातील धुळ्यात प्रशासनाचा मोठा बेजबाबदारपणा समोर आला आहे. जगात धुमाकुळ घातलेल्या कोरोना आजाराने सध्या भारतात विशेषतः महाराष्ट्रात प्रचंड थैमान घातलं आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असून अनेक लोक आपलं आयुष्य गमवत आहेत. अशातच एका 70 वर्षाच्या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र त्याचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याला कचऱ्याच्या गाडीतून नेण्यात आलं.

धुळ्यातील एका 70 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात देखील आलं. मात्र त्याच दिवशी घरी परतल्यानंतर त्यांचं निधन झालं. निधनानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह गावातून नेण्यासाठी प्रशासनाकडे रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली होती. मात्र दहा तासांच्या प्रतिक्षेनंतरही प्रशासनाकडून त्या कुटुंबियांना रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली नाही.

शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत रुग्णवाहिका न मिळाल्याने गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह गावातल्याच एका कचरा उचलणाऱ्या वाहनातून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. त्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे 55,411 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 309 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 इतकी झाली असून 57,638 जणांचा बळी गेला आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात 5,36,682 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत

थोडक्यात बातम्या-

वाझेंच्या अडचणीत वाढ; टीआरपी घोटाळ्यात ‘इतक्या’ लाखांची लाच घेतल्याचा आरोप

पुण्याला PM केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर निघाले खराब; अधिकाऱ्याने अजित पवारांकडे केली तक्रार

“प्रकाश जावडेकर दिल्लीत बसुन जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही”

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा!

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये एकही व्हेंटीलेटर बेड शिल्लक नाही

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More