नागपूर महाराष्ट्र

गोरक्षण संस्थेचा बेजबाबदारपणा; 50 मृत गायी उघड्यावर फेकल्या

चंद्रपूर |  चंद्रपूरमधील लोहारा-जुनोनो जंगलात 50 मृत गायी फेकून त्यांची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा बेजबाबदारपणाचा उद्योग गोरक्षण संस्थेचा असल्याचं उघड झालं आहे.

जंगलातील इतर प्राणी या मृत गायींना खात असल्याने या गायींना असलेले रोग वन्यजीवांना होण्याची भिती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्तवाहिनीने दिलं आहे.

चंद्रपूरमध्ये उज्ज्वल गोरक्षण संस्थेची एक गोशाळा आहे. लोकांनी दिलेल्या देणगीवर उज्ज्वल गोरक्षण संस्था गोशाळेतील जनावरांचा सांभाळ करते. मात्र संबंधीत संस्थेनं 50 मृत गायींबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, देशात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून चंद्रपूर परिसरात मोठ्या संख्येने गायींच्या तस्करीची प्रकरणे समोर आली आहेत.

महत्वाच्या बातम्या

-राजीव गांधींवर टीका केल्याने मोदी चांगलेच ट्रोल; लोकं म्हणतायेत मत मिळविण्यासाठी काहीही…

-…म्हणून मायावतींनी अमेठी रायबरेलीची जागा लढवली नाही!

-ओडिशाच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांनी केली 10 कोटींची मदत जाहीर

-या विदेशी लोकांनी देश लुटला; काँग्रेसचं नाव न घेता विवेक ओबेरॉयची टीका

-‘या’ कारणामुळे देशभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या