बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलासमोर गांजा ओढायचे इरफान खान?; व्हायरल फोटोवर बाबीलनं दिलं उत्तर, म्हणाला….

मुंबई | बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबील सोशल मीडियावर सक्रिय असलेला पाहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट शेअर करत असतो. इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बाबील खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच सध्या बाबील आणि इरफानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

व्हायरल फोटोमध्ये इरफान खान बाबीलसोबत सोफ्यावर बसून बोलताना दिसत आहेत आणि त्यांच्या हातात सिगारेट आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. एका युझरनं तर या फोटोवर कमेंट करताना इरफान यांच्या हातात जॉइन्ट म्हणजेच गांजा आहे का?, असं विचारलं. ज्यावर बाबीलनं त्या युझरला उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे.

मला नाही माहीत तुम्हाला जॉइन्ट कुठे दिसला. पण तुमची अशीच इच्छा असेल तर शुभेच्छा. इथे कोणताही जॉइन्ट नाहीये मित्रा. असं म्हणत बाबीलनं फोटोला ट्रोल करणाऱ्या युजर्सला कडक शब्दात उत्तर दिलं आहे.

दरम्यान, इरफानचा मुलगा बाबील आणि त्याची पत्नी सुतापा या अभिनेत्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर नेहमी काही ना काही पोस्ट करत असतात. बाबील लवकरच ‘काला’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात बाबीलसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

थोडक्यात बातम्या – 

“काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही”

“ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता?”

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेंशन वाढवलं; राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता

‘विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट’; भाजप नेत्यांसोबत मनसे आमदार मैदानात

बैठक भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची, चर्चा मात्र अजित पवारांची!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More