बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी काही गमावलं नाहीये…’; इरफान खानच्या पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट

मुंबई | अभिनेता इरफान खान याचं निधन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या मुलानेही आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर केल्या. यामध्येच इरफान खान याच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

मी काही गमावलं नाहीये. मी सारं काही कमावलं आहे, असं कॅप्शन देत इरफान खानची पत्नी सुतापाने एक फोटो शेअर केला आहे. सुतापाने दिलेली ही कॅप्शन अनेकांच्या काळजाला भिडली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

इरफान खान आजारी असताना त्याच्या प्रत्येक पावलावर सुतापाने त्याची साथ दिली आहे. मुलाखतीत बोलत असतानाही इरफानने वारंवार या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख केला होता.

दरम्यान, इरफान आणि सुतापा यांनी 1995 मध्ये लग्न केलं होतं. सध्या इरफानच्या पश्चात त्याची पत्नी सुतापा, दोन मुलं बाबिल आणि अयान आहेत.

 

 

View this post on Instagram

 

I have not lost i have gained in every which way..

A post shared by Sutapa Sikdar (@_sutapa_sikdar_) on

ट्रेंडिंग बातम्या-

इरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती!

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलात?, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय?… वाचा काय आहे प्रक्रिया?

महत्वाच्या बातम्या-

‘मातोश्री’ प्रवेशद्वारावरच्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण

कामगारांना घेऊन नाशिकहून लखनऊला विशेष ट्रेन रवाना; भुजबळांनी दाखवला हिरवा कंदील

…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More