बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी धक्का देण्याच्या तयारीत!

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, मराठवाड्यानंतर आता कोकणातील शिवसेना नेते राजन सावळी (Rajan Salavi) हे देखील शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोकणात सध्या शिवसेनेचे 3 आमदार आहेत. वैभव नाईक, भास्कर जाधव आणि राजन साळवी यांचा यात समावेश आहे. यातील राजन साळवी शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून साळवी हे शिंदे गटातील आमदारांच्या संपर्कात आहेत.

सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असं म्हटलं जातंय.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More