बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्विटवर ट्रेंड होतोय ‘अजय देवगन कायर है’? काय आहे किस्सा?

मुंबई | अजय देवगन नेहमी आपल्या कामाशी काम ठेवत असतो. पण सध्या अजय अचानक चर्चेत आला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजय देवगन ट्विटरवर ट्रेंड करतोय. ‘अजय देवगन कायर है’ हा हॅशटॅग सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. काही लोक अजयला जबरदस्त ट्रोल करत आहेत. काल अजय देवगन मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना एका शिख युवकाने अजयची गाडी अडवून शेतकरी आंदोलनावर कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे त्याला चांगलेच सुनावले आहे.

काल सकाळी गोरेवामधील दिंडोशी परिसरात ही घटना घटली आहे. अजय देवगन आपल्या कारच्या आत बसलेला असताना आरोपी राजदीप सिंहने अजयला ‘पंजाबचा शत्रू’ म्हणत 15 ते 20 मिनटे त्याची गाडी अडवून धरली आणि शेतकरी आंदोलनावर आत्ता तरी बोल, असा आग्रह करत या युवकाने गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी राजदीपला अटक केली.

या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ काल चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या काही तासानंतर राजदीपची जामीनावर सुटका झाली. या सगळ्या प्रकरणानंतर आज अजय देवगन सोशल मीडियावर ट्रेंड करु लागला आहे. लाेकांनी त्याला ‘कायर’ ठरवले आहे. तू खोटा सरदार आहेस, असं लोकांनी अजय देवगनला म्हटंल आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात अमेरिकन पाॅप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलवानर ट्विट केले होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता. यावेळी अजयने रिहानाच्या ट्विटच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट केली होती. भारत व भारताच्या धोरणांविरोधात पसरवण्यात येणाऱ्या खोट्या प्रचारात अडकू नका. यावेळी एकजूट होत अंतर्गत कलहाशी लढणे अधिक महत्वपूर्ण आहे, असे अजय देवगनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या –

सरकारी धोरणांना विरोध करणं म्हणजे देशद्रोह नाही- सर्वोच्च न्यायालय

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ बड्या टोळीच्या म्होरक्याला केलं अटक

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ कामात घोटाळा झाला का? होणार चौकशी

बिपाशा बासूचा हॉट अंदाज; नवऱ्याला म्हणाली ‘जळतंय माकडं’; पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 10 जणांचा मृत्यू, 995 पॉझिटिव्ह!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More