बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कन्यादान करायला मुलगी वस्तू आहे का?”; कन्यादान शब्दावर आलियाचा आक्षेप

मुंबई | प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून अभिनेत्री आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. त्यानंतर आलिया भट्ट ‘बॉबी गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर आलिया भट्ट सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत असते. त्यातच आता आलिया भट्ट एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे.

आलिया भट्टने एका कपड्याच्या ब्रॅण्डसाठी जाहिरात केली आहे. जाहिरातमध्ये असे दाखवले आहे की, आलिया भट्ट ही नवरीच्या भूमिकेत आहे. ती लग्नमंडपात नवरदेवाच्या बाजूला जाऊन बसते. लग्नाचे विधी सुरू असताना तिला ‘मुलीं या परक्याचे धन असतात’ अशा लहानपणात ऐकलेल्या गोष्टी आठवू लागतात.

लग्नमंंडपात बाकीचे विधी संपल्यानंतर कन्यादानाचा विधी सुरु होतो. या विधीसाठी वधूपिता आपल्या लेकीचा हात नवरदेवाच्या हातात देतात, तेव्हा आलिया भट्ट अभिमानाने म्हणते की, कन्यादान का म्हणता? कन्यामान म्हणा. आमचे दान करायला किंवा आम्हाला असं कुणाला देऊन टाकायला आम्ही काय एखादी वस्तू आहोत का? असं आलिया भट्टने या जाहिरातमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, आलिया भट्टने जाहिरात मधून विचारलेला प्रश्न महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर जाहिरातमधून दिलेला संदेश समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट् देखील केल्या आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओ पसंती देखील दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohey (@moheyfashion)

थोडक्यात बातम्या- 

ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

किरीट सोमय्या ईडीचे प्रमुख आहेत का?- सुप्रिया सुळे

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More