बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् तो पुन्हा परत आला! रोहित बाद होताच केली त्यानं एन्ट्री; पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. इंग्लंडने पहिल्या डावाअखेर 354 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डावात भारताची फलंदाजांनी सावध फलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय सलामवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं.

सामन्याचं 48वं षटक सुरू असताना राॅबिन्सनने रोहित शर्माला बाद केलं. रोहित 59 धावा करत बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात येणं अपेक्षित होतं. मात्र, त्याऐवजी एक फॅन बॅटिंगसाठी मैदानात उतरला. जारवो नावाचा फॅन पायात पॅड, हेलमेट, गल्बज आणि बॅट घेऊन मैदानात आला. मैदानातील सर्व खेळाडू त्याला पुन्हा पाहून आश्चर्यचकित झाले.

जारवो पिचपर्यंत पोहचला तरी कोणालाही खबर लागली नाही. कोहली ऐवजी दुसरंच कोणीतरी मैदानात आल्यानं सुरक्षारक्षकांनी मैदानात धाव घेतली आणि जारवोला मैदानाबाहेर काढलं. भारतीय संघाची जर्सी घातल्यानं जारवोला कोणी ओळखलं नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, याआधी लाॅर्डस दुसरी टेस्ट मॅच चालू असताना जारवो मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला होता. भारतीय संघाच्या जर्सीत जारवो मैदानात आला होता. सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानातून बाहेर काढलं होतं. त्यावेळी देखील मैदानात एकच हशा पिकला होता. त्यानंतर आता तो पुन्हा मैदानात आल्यानं गोंधळ उडाला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची हकालपट्टी करा; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

दोन दिवसांमागे रूग्णांच्या सख्येमध्ये वाढ झाल्यानंतर जाणून घ्या पुण्याची आजची आकडेवारी

‘भान राखून वक्तव्य केलं असतं तर…’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राणेंना टोला

सोन्याच्या भावात वाढ, तर चांदीत घसरण; वाचा ताजे दर एका क्लिकवर

“आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More