बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?- संजय राऊत

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी आज ईडीने छापेमारी केली. ईडीने केलेल्या या कारवाईवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत संताप व्यक्त केला आहे. तसेच यावरून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीने छापेमारी केली. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. ईडी आणि सीबीआयची बदनामी होतेय, हे संबंधितांनी लक्षात घ्यावं. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच झालं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो. विनाकारण त्रास हा शब्द सरनाईक यांच्या पत्रात देखील होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही, असं राऊत म्हणाले.

आणीबाणीला विसरा आता. त्याचा बाऊ करु नये.. इंदिरा गांधी यांनी थेट आणीबाणी लावली होती. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी वाटते. राष्ट्रहितसाठी कठोर व्हायला हवं, असंही संजय राऊत म्हणाले.

महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

थोडक्यात बातम्या- 

“माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही”

शाळा सुरू करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल- बच्चू कडू

“डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; महाराष्ट्राने कोरोनाची स्थिती उत्तम हाताळली”

“अनिल देशमुखांची काही दिवसांनी तुरूंगात रवानगी होणार”

“हातात होतं तेव्हा केलं नाही अन् आता तुम्ही म्हणताय 4 महिन्यात करतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More