“छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठ्याने गाणी लावायची असं आहे का?”
सातारा | राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून वातावरण सध्या कमालीचं पेटल्याचं दिसत आहे. यातच आता सातारा नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे त्याप्रमाणे सातारामधील राजकारणही चांगलंच तापत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात कलगितुरा रंगला आहे. उदयनराजेंनी नुकतीच साताऱ्यातील एक सोसायटी ताब्यात घेतली असून यावेळी विजयी उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजेवर सडकून टीका केली. यावर आता शिवेंद्रराजेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठ्याने गाणी लावायची असं आहे का? यात्रेत आपण डोंबाऱ्यांचे खेळ पाहतो, परवा वाढदिवसाला उदयनराजेंचा एक डोंबाऱ्याचा खेळ पाहिला. आपण राज्यसभेचे खासदार आहोत, काय करत आहोत याचं भान ठेवलं पाहिजे, असं म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर खरमरीत टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहेत तर मग लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? आणि विधानसभेत मी निवडून का आलो?, याचं उत्तर उदयनराजेंनी द्यावं, असं शिवेंद्रराजे म्हणाले आहेत. त्यामुळे सध्या साताऱ्यातील वातावरही जोरदार तापलं आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर
रशिया युक्रेनवर ‘हा’ मोठा हल्ला करण्याच्या तयारीत?, अमेरिकेने दिला सतर्कतेचा इशारा
भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, गोव्यात मुख्यमंत्री कोणाचा?
कुणाला मिळणार जनतेचा कौल?; 5 राज्यांचं भवितव्य ठरणार
“…हे तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखंच”, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Comments are closed.