“कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर”
मुंबई | कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. संपूर्ण देश यावर वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लावलं जात आहेत. मात्र महाराष्ट्रात जे कडक निर्बंध लावले जात आहेत त्याला मनसेकडून विरोध केला जात आहे.
महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय ?, असा प्रश्न मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला केला आहे. राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकांना भीती दाखवली जात आहे, असा आरोप मनसेकडून केला जात आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
तुमचे घाणेरडे प्रकरण बाहेर येत आहेत म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर का कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ? असा सवाल मनसेने राज्य सरकारला विचारला आहे.
दरम्यान, लाॅकडाऊन लावलं तर जनतेनं काम काय करायचं ? वीज बिलाचे पैसे त्यांनी कसे भरायचे? सरकारने कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायचं का?कोरोना रुग्ण संख्या कमी होते तेंव्हा आदित्य ठाकरे यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक नियमांचं पालन करत नाही, अशी खोचक टीका मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर केली आहे. त्याचबरोबर जर लॉकडाऊन लावायचा असेल तर मग वीज तोडणी बंद करा, अशी मागणी मनसेने केली आहे.
महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे करोना वाढत नाही. करोना च महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच करोना वर प्रेम आहे?की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि करोना चा वापर होतोय?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 16, 2021
थोडक्यात बातम्या –
चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने केलं धक्कादायक कृत्य!
…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन- नितेश राणे
“देश नहीं बिकने दूंगा म्हणत मोदी सरकार एक एक करत सर्व विकतंय”
चिंताजनक! पुण्यात कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळेना
कोरोना लसीकरणासंदर्भात आनंद महिंद्रांनी मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Comments are closed.