बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग येथे बोलत असताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना सावंतवाडी तालुका भाजपमय करण्याचं आवाहन केलं आहे. ते आदीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

पक्षातील प्रत्येकाला पद मिळते. मात्र, पद एकाला मिळाल्यास त्याला पाडायचा प्रयत्न करू नका. तुम्ही हक्काने पद मागा मी ते नक्की देईल. परंतु, गद्दारी केल्यास मी ती सहन करणार नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. सावंतवाडी हा माझा आवडता तालुका आहे. मात्र, सावंतवाडी कुडाळ या दोन आमदारांसह लोकसभेचा खासदार आपला नाही याचं शक्य असल्याचं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

मी आमदार असताना विधानसभा गाजवली एक इतिहास निर्माण केला. कोकणातील बुद्धीमत्ता कशी असते हे मी महाराष्ट्रातील आमदारांना दाखवून दिले आहे. मात्र, इथले आमदार काय बोलतात हेच समजत नाही. गावचा सरपंच देखील इथल्या आमदारांपेक्षा चांगलं बोलतो.  जिल्हा नियोजनामध्ये कोणते विषय केव्हा बोलायचे, केव्हा बोलायचे हेसुद्धा यांना माहित नाही, असं टीका नारायण राणे यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री असताना मुंबईवर गुंडाची दहशत होती. मात्र, असे असतानाही मी ती दहशत मी मोडून काढली. आताच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये ती धमक आहे का? असा खोचक सवाल नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे देशाचे संरक्षण करणारे आणि देशाची किर्ती जगभर पोहोचवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप पक्ष वाढल्यास महाराष्ट्र नक्कीच विकसित होईल, असं नारायण राणे यांनी सांगितलंं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

‘द वाॅल’चा मास्टरप्लॅन तयार! न्यूझीलंडविरूद्ध ‘या’ रणनितीसह मैदानात उतरणार

‘एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं’; भाजपची खुली ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More