नवी दिल्ली | सध्या भारत-चीन सीमाभागात तणावाचं वातावरण आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या काठावर चीनचं सैन्य जमा केलं असून तेथे भारतीय सैन्यही तैनात करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
चीनने आपल्या भूभागावर मिळवलेला ताबा सुद्धा अॅक्ट ऑफ गॉड आहे का? चीनने आपली जमीन घेतली आहे. सरकारकडे ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याची काही योजना आहे का? की याला पण आता अॅक्ट ऑफ गॉडच म्हणायचं?, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी ही टीका करताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या वक्तव्याचा संदर्भा देत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, कोरोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ आहे. त्यामुळे यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं म्हणत सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसान भरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचं सांगितलं होतं.
The Chinese have taken our land.
When exactly is GOI planning to get it back?
Or is that also going to be left to an ‘Act of God’?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 11, 2020
महत्वाच्या बातम्या-
क्वीन कंगणा एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेते 1.5 कोटी तर पुर्ण चित्रपटासाठी…..
“कंगणाचं ऑफिस अनधिकृत? असेलही… पण ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे?”
‘त्या पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते’; ‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा!
अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावलेला टेम्पो; पोलिसांनी पकडल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार
उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील