बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य?, जाणून घ्या!

नवी दिल्ली | सकाळी अनेकांना व्यायाम करण्याची सवय असते. अशातच बाहेर सध्या कोरोनाचं वातावरण सुरु आहे. अशा परिस्थितीत बाहेर जॉगिंग करताना सध्या मास्कचा वापर केलेला दिसतो. जॉगिंग किंवा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

तुम्ही जर व्यायाम करायला बाहेर पडत असाल किंवा मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग करायला बाहेर पडत असाल तर तुम्हाला स्वत:ची काळजी घेणे भाग आहे. यासाठी प्रत्येकजण मास्कचा वापर करत असाल मात्र व्यायामप्रकार करताना मास्क वापरला तर, ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या बाबतची काळजी घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

मास्क घालून व्यायाम, जॉगिंग, मॉर्निंग वॉक करत असाल तर शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळं तुम्ही हवेतून जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करता. त्यामुळं तुम्ही कार्बन डायॉक्साईडही जास्त सोडता. अशावेळी तो ऑक्सिजन मास्कमध्येच अडकून राहतो. हा कार्बन डायॉक्साईड पुन्हा नाकावाटे आत जातो. त्यामुळे तुम्हाला श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होतो. तसेच त्यामुळे तुम्हाला थकवाही जाणवू शकतो

दरम्यान, महापालिकेने परवानगी दिल्यावर नागरिकांनी रस्त्यावर सकाळी जॉगिंग, वॉकिंग सुरू केले आहे. मात्र, नागरिक सर्रास मास्क वापरून व्यायाम प्रकार करीत आहेत. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या संख्येने समावेश आहे. जेव्हा तुम्ही जॉगिंग करताना आजूबाजूला गर्दी असेल तसेच जेव्हा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठीण असेल तेव्हाच मास्क घालणेच योग्य.

थोडक्यात बातम्या – 

बाप रे! पावसाच्या भयंकर रूपाने वाहतुकीचा महाराष्ट्रातील हा पूल लोकांच्या डोळ्यासमोर गेला वाहून

प्रसिद्ध अभिनेता बोमन इरानी यांच्या आईचं निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाची कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज!

लहान मुलांवर ट्रायल सुरू होण्याआधी Bharat biotech ने केली मोठी घोषणा!

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More