बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किरण गोसावीचा मनसुख हिरेन झालाय का?”

मुंबई | अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. त्यातच आता किरण गोसावी याचा आर्यन खान सोबत सेल्फी काढतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने शपथपत्र  जारी करत अनेक दावे केले आहेत. अशातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आपल्या जीवाला धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी प्रभाकर साईलने पोलिसांकडे केली आहे. सध्या किरण गोसावी एनसीबीच्या ताब्यात आहे. किरण गोसावीसोबत सुद्धा मनसुख हिरेनसारखा प्रकार झाला असेल, असं प्रभाकरचे म्हणणे आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच नवाब मलिक यांनी किरण गोसावीचा मनसुख हिरेन केलाय का? अशी शंका उपस्थित केली आहे.

आर्यन खानला सोडवण्याकरिता किरण गोसावीने 25 कोटी रूपयांची मागणी केली आहे, असा दावा प्रभाकर साईलने केला आहे. प्रभाकर साईलच्या दाव्यानुसार 25 कोटींचं डिल ही समीर वानखेडे यांच्यावतीनं करण्यात आली आहे. प्रभाकर साईल किरण गोसावीचा बॉडीगार्ड आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार आहे.

दरम्यान, एनसीबीची जबाबदारी आहे की, किरण गोसावीला पोलिसांसमोर हजर करायला हवं, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. मी समीर वानखेडेंना ओळखत नाही. मी त्यांना फक्त टीव्हीवर पाहिलं आहे. तसेच पैशांबाबत माझं काहीचं बोलण झाल नाही. जे माझ्यावर आरोप करत आहेत त्यात काही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण किरण गोसावी यानं दिलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

तुमचंही कमी वयात टक्कल पडतंय का? जाणून घ्या कारण

“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”

“…म्हणून या नाना पटोलेला गरिबाचं दु:ख जास्त कळतं”

आयपीएलला मिळाले 2 नवे संघ! आयपीएल इतिहासातील विक्रमी बोली लागली

”ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’; नितेश राणेंचा थेट इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More