बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किरीट सोमय्या आंतकवादी आहेत का?’; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मुंबई | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापूरात जाणार आहेत. परंतु कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोमय्यांना मुंबईत पोलिसांनी स्थानबद्ध केल्याची माहिती समोर आली होती. यावरून महाविकास आघाडी सरकारला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या दडपशाही आणि गुंड प्रवृत्तीला भाजप घाबरणार नाही. किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते आतंकवादी आहेत का? असा संतप्त सवाल चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती. या प्रकरणाबाबत त्यांच्यावर दोन-चार आठवड्यांत कार्यवाही होणं अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्यांचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. राज्यात काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संघर्ष सुरूच राहणार आहे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल राज्य सरकारचा निषेध देखील व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

आमची सत्ता आली तर…’; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री?; थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता

“चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता”

भाजप नेते किरीट सोमय्या स्थानबद्ध???; देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने खळबळ

‘डाॅल्फिनने माझ्यासोबत सेक्स केला अन् …’, महिलेने केला अजब खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More