बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ती खरंच गरीब आहे का?’; सायली कांबळेला गरीब दाखवल्याने ‘इंडियन आयडल 12’ वादाच्या भोवऱ्यात

मुंबई | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडाॅल 12’ च्या समोरील अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीयेत. हा शो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर कार्यक्रमाबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. एकीकडे कार्यक्रमातील स्पर्धक त्यांच्या गोड गळ्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. तर दुसरीकडे स्पर्धकांच्या गरिबीचं कार्यक्रमात प्रदर्शन मांडलं जात असल्याचं सांगत नेटकऱ्यांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांना धारेवर धरलं आहे.

इतकंच नाही तर शोमधील स्पर्धकांवर खोटं बोलण्याचे आरोपदेखील केले जात आहेत. आधी सवाई भट आणि आता सायली कांबळेमुळे ‘इंडियन आयडल 12’ चर्चेत आहे. कार्यक्रमात दाखवण्यात आल्याप्रमाणे सायली अत्यंत गरीब घरातून आली असून तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत. त्यांच्या घराची परिस्थिती बेताची असल्याचं तिने सांगतिलं होतं.

जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत झालेल्या भागात सायलीने तिच्या घरी टीव्ही नसल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार कार्यक्रमात दाखवलं होतं की, कशी एका गरीब घरातील मुलगी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ‘इंडियन आयडल’च्या मंचापर्यंत पोहोचली. मात्र, सोशल मीडियावर सायलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांच्या मते जर सायली इतक्या मोठ्या कलाकारासोबत मंचावर गाणं गाते आहे. तर ती अशीच कोणतीही छोटी कलाकार नाही. शिवाय नेटकऱ्यांनी निर्मात्यांना विचारणा केली आहे की, जर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड आधीपासूनच झालेली असते तर ऑडिशन्स कशासाठी घेण्यात येतात. याआधीही कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर टीआरपी वाढवण्यासाठी स्पर्धकांना गरीब दाखवण्याचा आरोप करण्यात आला होता.

 

थोडक्यात बातम्या – 

“सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नाहीत, ‘यूपीए’ला सक्षम करण्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं”

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षापासून विकास डाऊन”

‘कोरोना रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून…’; ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला संताप व्यक्त

मास्क नाही घातलं म्हणून केली चौकशी, चिडलेल्या महिलेने केली पालिका कर्मचारिकेची पिटाई, पाहा व्हिडीओ

जॉन अब्राहमवर आली सिनेमाची तिकीटं विकण्याची वेळ, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More