बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्राचा निकाल चंद्रकांत पाटील आणि राणेंसारख्या नेत्यांना मान्य आहे का?”

मुंबई | केंद्राने 102 घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना बहाल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज्य सरकारच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यातच आता शिवसेनेने देखील अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 50 टक्क्यांची मर्यादा असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असं वक्तव्य शिवसेनेनं केलं आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा फक्त भाजपच सोडवू शकतो. आमचं सरकार राज्यात नसल्यानं मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, असं चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे यांनी वारंवार म्हटलं आहे. आरक्षणाचा अधिकार हा केंद्राला आहे, राज्यांना नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. मग केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे यांना मान्य आहे का? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

इंद्रा साहनी प्रकरणात केंद्राने सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा आणली होती. त्यामुळे आता राज्यांना आरक्षणावर कायदे करण्याचे अधिकार राहिले नाहीत, हे केंद्राला माहित नाही का? मग केंद्राने असं का केलं? घटनादुरूस्तीकरून 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करून केंद्राला राज्यांना अधिकार द्यावेच लागतील. नाहितर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा काहीच उपयोग नाही, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

दरम्यान, कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांनी केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री किरण रिजीजू यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. मग याचा अर्थ असा घ्यावा का की, संभाजीराजे केंद्राने घेतलेल्या निर्णयाशी सहमत आहेत ,असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर केंद्राने सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे सरळ टोलवाटोलवी असं मराठा चळवळीतील नेत्यांचं मत आहे, असंही यात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आमच्या लाडक्या अमृता फडणवीसांना काही काम नाही, पक्षाने त्यांची प्रवक्तेपदी नेमणूक करावी”

“अमृता वहिनींनी पुण्यावर नाही तर, गाण्यावर काम करावं”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

माेठ्या गोंधळानंतर अखेर राज्यपालांनी एमपीएससीच्या तीन सदस्यांची केली निवड!

…अन् अवघ्या 10 सेकंदात हुकलं दीपक पुनियाचं कांस्यपदक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More