“शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर आहे का?, जर बाळासाहेब ठाकरे असते तर…”
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने(ED) जप्त केली आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. त्यातच आता संजय राऊत दिल्लीहून परतल्यानंतर विमानतळावर राऊतांचे स्वागत करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. त्यावरून खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी जोरदार टीका केली आहे.
शिवसैनिकांचे डोके ठिकाणावर नाही. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि महाराष्ट्रातील लोकांच्या पैशाचा गैरवापर केला आहे. संजय राऊत तपासात अडकलेले आहेत. त्यांचं स्वागत शिवसैनिक करत आहेत. जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर महाराष्ट्रामध्ये असं काहीही घडलं नसत, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी अशा लोकांना उभ केलं नसतं. संजय राऊत यांच्यावरील आरोप सिद्ध होत असल्याने संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली आहे. यामुळे शिवसैनिकांनी विचार करून गोष्टी करायला हव्यात, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत मुंबईत परतत आहेत. शिवसेनेचा योद्धा दिल्लीहून मुंबईत येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा योद्धा पक्षासाठी आणि महाविकास आघाडीकरिता लढत आहे. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक योद्धाला सलाम करण्यासाठी याठिकाणी आलो आहोत, असं शिवसैनिकांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
‘चंद्रकांत दादा परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही’, कोथरूडमध्ये पुणेकरांची खास टोमणेबाजी
पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
किरीट सोमय्यांची नवी खेळी, अडचणी वाढताच…
‘रशियाशी मैत्री वाढवली तर…’; अमेरिकेचा भारताला थेट इशारा
वसंत मोरेंना मनसेचा झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.