बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? सत्तेची इतकी लालसा आहे की…”

मुंबई | माध्यमांवरील बातमीनुसार, शरद पवार यांनी खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अनिल देशमुख यांच्यासंदर्भातील कारवाईबद्दल अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना आज दिल्लीत बोलावले. याचदरम्यान, राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला आहे.

तुमच्या गृहमंत्र्यांना महिन्याला 100 कोटींची वसुली हवी आहे, ही बातमी आणि पुरावे डीजी पद असणारा अधिकारी लेखी सादर करत असूनही तुम्ही देशमुखांवर काय कारवाई करावी याची अजून चर्चा करत आहात ? सत्तेची इतकी लालसा आहे की, आपण महाराष्ट्रसुद्धा विकायला तयार झाला आहात?, असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून केले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे, सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. आज पुण्यात देखील आंदोलन करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

दरम्यान, आम्ही आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन केले. येत्या आठवड्याभरात राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

ना अजित पवार, ना जयंत पाटील; शरद पवार आपल्या ‘या’ विश्वासू माणसाकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गुढ उकललं; पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण!

“बरंच काही बोलून काहीही न सांगणं हे शरद पवारांचं वैशिष्ट्य”

1 लाख रुपयात बुक करा BMW ची शानदार कार; जाणून घ्या किंमत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More