बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का?’; लखीमपूर घटनेवरून संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल!

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांना निर्दयीपणे केंद्रीय राज्यमंत्र्याचा ताफ्यातील गाडीनं चिरडलं गेलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आंदोलक शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

आज मंगळवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. प्रत्येक गोष्टी मी माध्यमांना सांगू शकत नाही. काही गोष्टी आमच्या दोघांमध्ये राहूद्या, असं संजय राऊत यांनी सांगितलं. पत्रकारांनी संजय राऊत यांना विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ उत्तरप्रदेशमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर संजय राऊत यांनी याबाबतही आमची चर्चा झाली आहे. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल, असं राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात लोकशाही व्यवस्था पुर्णपणे उद्धवस्त झाली आहे. आज माझी राहुल गांधीसोबत राजकीय चर्चा झाली, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसेच यावेळी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘माझ्या वडिलांना…’; एनसीबीकडे शाहरूख खानबाबत आर्यनने केलं मोठं वक्तव्य!

तालिबान्यांच्या ‘या’ नव्या फतव्यामुळे अफगाणिस्तानमधील तरूण मोठ्या संकटात!

महाराष्ट्राच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्याच्या नातीला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता करतोय डेट???

केंद्राने गरिबांच्या खात्यावर 1 लाख कोटी पाठवले- नरेंद्र मोदी

ह्रदयद्रावक! शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडत होता, गाडीतून व्यक्ती उतरला अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More