बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यामागे भाजपची ‘ही’ मोठी खेळी?

नवी दिल्ली | भारताच्या विद्यामान राष्ट्रपतींचा, रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ संपला असून आता देशाचे नवीन राष्ट्रपती नेमण्यासाठी येत्या 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी दिली असून देशातील सर्व विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्याचबरोबर आता उपराष्ट्रपतीपदासाठी देखील भाजपने उमेदवार उभा केला आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांना भाजपतर्फे उपराष्ट्रपदासाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचे वैर संपुर्ण भारतवर्षाला माहित आहे. राज्यपालांचे आणि ममता बॅनर्जी यांचे सुद्धा अनेक मुद्द्यांवरून वाद आहेत. तेव्हा आता त्यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार करुन भाजप कोणते नवे राजकारण खेळत आहे का? अशी सर्वांना शंका आली आहे.

धनखड हे मुळ राजस्थानातील जाट समाजाचे नेते आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण राजस्थानातच झाले. ते राजस्थानात बार असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी 11 वर्षे काँग्रेसमध्ये काम केले आहे. धनखड यांचा कायदा आणि राजकारणात हातखंडा आहे. राजस्थानात जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

दरम्यान, धनकड केंद्रीय मंत्री देखील राहीले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविली होती. 2003 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजस्थानात पुढील वर्षात विधानसभा निवडणूका आहेत. त्यामुळे जाट समाजातील उमेदवार देऊन भाजपची राजस्थान विधानसभेवर नजर असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच जाट समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे एकीकडे राजस्थानातील लोकांचे मतपरिवर्तन घडवून काँग्रेसच्या हातून राजस्थान काढून घेण्याचे राजकारण भाजप करत असल्याचा संशय आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले

मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला

संजय राऊतांनी गजनी सिनेमा पहावा, आशिष शेलारांचा खोचक सल्ला

‘हे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर’, शिवसेनेची मोदी सरकारवर सडकून टीका

मुंडे बहिण-भावांमध्ये जुंपली, श्रेयवादासाठी चढाओढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More