‘ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून भुजबळांवर कोणाचा दबाव आहे का?’; फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई | पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरल्याचं पहायला मिळालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्याबरोबरच राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावरुन घेरलं आहे. आज विरोधकांनी ‘ओबीसी बचाव’ च्या टोप्या घालेल्या पहायला मिळालं.
विरोधकांसोबत मंत्री छगन भुजबळ यांनीही ‘ओबीसी बचाव’ची टोपी घातल्याचं पहायला मिळालं. भुजबळांवर दबाव आहे का की सगळ्या निवडणुका ओबीसींशिवायच व्हायला हव्यात? तुम्ही टोपी घातली पण तुम्हाला कुणी टोपी घातलीय का?, असा खोचक सवाल फडणवीसांनी केला आहे.
आमची भूमिका सहकार्याचीच आहे. पण राज्य सरकार सिरियस आहे का?, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षाच्या मुद्द्यावरुन जोरदार घोषणाबाजी बोत असल्याचं पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! युक्रेनमधून निघालेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली
Audi कंपनीचा ग्राहकांना झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-अमेरिकेत वादाची ठिणगी?, महत्त्वाची माहिती समोर
रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवलं?, परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
कोरोना कायमचा संपला नाही, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
Comments are closed.