बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुण्यात केवळ शनिवारवाडाच आहे का?”, अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

पुणे | पुणे (Pune) हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर (Cultural city) आहे. पुण्याला मोठा ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. मात्र, पुण्याची ओळख म्हणजे फक्त शनिवारवाड्यापर्यंतच मर्यादीत राहिलेली दिसत असते. अशातच शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी पुणे विमानतळावरील फोटो शेअर करत एअरपोर्ट अॅथरिटीवर चांगलीच टीका केली आहे.

पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा (Shaniwarwada) नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लाल महालसुद्धा आहे, पुण्यात सिंहगड देखील आहे आणि याच पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी देखील आहे, असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे. या सर्व गोष्टींचा पुणे एअरपोर्ट अॅथरिटीला विसर पडला की काय?, असा प्रश्न ट्विटच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावरचे काही दोन आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या ट्विटवरून वादाला देखील सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. नेटकऱ्यांनी अमोल कोल्हे यांना ट्रोल केल्याचं दिसतंय. तर काहींना अमोल कोल्हे यांच्या ट्विटचं कौतुक देखील केलं आहे. मात्र, आता सोशल मीडियावर या ट्विटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या-

शिवसेनेची नेमकी भूमिका काय? तिसऱ्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं…

PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; आता मुख्य परीक्षा ‘या’ तारखेला होणार

बुस्टर डोसची गरज आहे का?, असेल तर कोणती लस घ्यावी?; तज्ज्ञ म्हणतात…

रोहित पवारांना मंत्रिपद मिळणार का?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“लड़ोगे नहीं तो जीताेगे कैसे?”, प्रियंका गांधींचा पारा चढला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More