बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता एवढा माज आला का?’; शहनाझचा ‘हा’ व्हिडीओ पाहून भडकले चाहते

मुंबई | ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाझ गील नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर शहनाझ कधी तिच्या म्युझिक व्हिडीओ तर कधी बॉडी ट्रान्सफर्मेशनमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. अशातच शहनाझ सध्या व्हायरल व्हिडीओमुळे ट्रोल होत असल्याचं दिसून आलं.

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. यात शहनाझ सेटबाहेर येताना दिसतेय. तिच्यासोबत काही स्टाफमधील लोक आहेत. यात शहनाझ एका स्टाफकडून तिची हिल्सची सॅण्डल काढून घेत असल्याचं दिसतंय. हा स्टाफ मेंबर खाली वाकून शहनाजची सॅण्डल काढतो त्यानंतर ती चप्पल घालून पुढे चालू लागते. मात्र शहनाजच्या या वागण्याचा नेटकऱ्यांना मात्र चांगलाच संताप आलाय.

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती शहनाज, तुला लाज वाटायला हवी, असं म्हणत अनेकांनी शहनाझला ट्रोल केलं आहे. एवढंच नाही तर काहींनी ती आता माज आल्यासारखं वागत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, शहनाझ लवकरच दिलजीत दोसांजसोबत ‘हौसला रख’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतही एका प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

थोडक्यात बातम्या – 

‘…तर आमचा उमेदवार हरला तरी आम्हाला पर्वा नाही’; जि.प. पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं वक्तव्य

सलाम कोल्हापूरांना! कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी केला हा खास उपक्रम

आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी! मानधनात वाढ आणि कोविड भत्ताही मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा म्हणत परिचारिकांचं आंदोलन!

“सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More