बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुश्रीफांच्या आरोपामध्ये बूड असेल तर…’; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी कोट्यावधी रूपयांचे घोटाळे केल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यावर उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी आरोप फेटाळून लागले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची तक्रार करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्यावर आपण रस्ते घोटाळ्याच्या चौकशीसाठी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दावा दाखल करण्यासाठी लागणारा व्हाॅईट मनी आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.

मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर, माझ्यावर कारवाई होईल. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोपा लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

दरम्यान, ते नेहमी 100 कोटींच्या दाव्याच्या बाता करतात, त्यापेक्षा जास्त दावा ठोका, असा रोखठोक सल्ला देखील चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. त्यांचं सरकार येऊन 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. त्यांना कुणी रोखलंय? माझ्यावर खुशाल तक्रार करा, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

सुशांतसिंग राजपूत पुन्हा चर्चेत! ट्विटर अचानक ट्रेंड होतंय ‘CBI CONFIRMS SSR MURDER’

पैसे परत न दिल्यानं भरमंडईत महिलेची छेडछाड; महिलेनं दिला आत्मदहनाचा इशारा

‘काॅंग्रेसनेच दहशतवादाला जन्माला घातलं’; योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर जहरी टीका

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More