Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार?”

Photo Courtesy- Facebook/Narendra Modi

मुंबई | देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरी पार करतील असं दिसतंय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

या पोस्टरमध्ये ‘यही है अच्छे दिन?’, असा प्रश्न उपस्थित करत मागील मोदी सरकार पहिल्या टर्मची आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दरवाढीची तुलना करण्यात आली आहे. यात 2015 साल आणि 2021 मधल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या दरवाढीची तुलना केली आहे.

वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर दरवाढीचे  पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्याचं काम सुरु होतं. वाढत्या महागाईविरोधात हा निषेध नोंदवण्यासाठी ही पोस्टरबाजी करत आहोत, असं वांद्र्यातील युवासेना कार्यकर्ते अक्षय पानवलकर यांनी सांगितलं आहे.

काही दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमतीत एवढी वाढ झाली आहे की आता हे दर शंभरी पार करतील असं वाटत आहे. म्हणून देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलनं केली जात आहेत. राजकीय पक्षांनीही मोदी सरकारविरोधात आंदोलनं केली. त्यात युवासेनेकडून पेट्रोलपंपावर पोस्टरबाजी आणि घोषणाबाजीही करण्यात आली. त्याचसोबत केंद्र सरकारनं यावर लवकरात लवकर पाऊलं उचलून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी युवासेना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

‘या’ मुलाचा व्हिडीओ पाहून शंकर महादेवन म्हणाले…’एकदा तरी त्याला भेटण्याची संधी मिळो’

धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा; शरद पवार, फडणवीस होते हजर

“राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा”

“…अन्यथा तुम्हाला कोरोना झाल्यास सरकार उपचारांसाठी येणारा खर्च देणार नाही”

‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या