मुंबई | ही आर्थिक गुन्हे शाखा आहे की सेटलमेंट ब्रॅन्च आहे?? असा सवाल करत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष बैठकीत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पोलीस महासंचालक कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर संजय बर्वे यांनी गुन्हे शाखेच्या अधिकांऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व कामकाजाची माहिती घेतली. यानंतर दाखल असलेले गुन्हे, अटक आरोपी, फरार आरोपी अशा बाबी तपासण्यात आल्या. हे सर्व पाहून ही शाखा सेटलमेंट ब्रॅन्च झाली आहे, अशा शब्दात बर्वे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखा कशाला हवी? असा सवाल करत बर्वे यांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…
महत्वाच्या बातम्या-
-मुंबईच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्तपदी ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती?
-आदित्य ठाकरेंना भाजपच्या नगरसेवकांनी रोखलं; युतीतील मतभेद चव्हाट्यावर
-रक्षाबंधनच्या मुहूर्तावर केजरीवाल सरकारचं महिलांसाठी स्पेशल गिफ्ट; भाऊबीजेपासून अंमलबजावणी
-मी बिकाऊ नाही; मुलाला अटक केल्यानंतर भाजप खासदाराचं मोदींना ट्विट
-अंबानी झाले आणखी श्रीमंत; गेल्या दोन दिवसात संपत्तीत झाली ‘इतक्या’ कोटींची वाढ!
Comments are closed.