बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईशा देओल ‘या’ वेबसीरीजमधून करणार डिजीटल क्षेत्रात पदार्पण!

मुंबई | ईशा देओल बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरनंतर तिने आपला पूर्ण वेळ फॅमिलीसाठी दिला होता. आता पून्हा ईशा अभिनय क्षेत्रात पूनरागमन करणार आहे. त्यामुळे ईशाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

अजय देवगण स्टारर ‘रुद्र, द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून ती पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ही सीरिज डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ब्रिटिश सायकोलॉजिकल थ्रिलर सीरीज, लुथर या क्राईम ड्रामाचा रिमेक म्हणजे ‘रुद्र ,द एज ऑफ डार्कनेस’ ही सीरिज असणार आहे.

ईशा देओल आणि अजय देवगण चक्क 15 वर्षानंतर एकत्र काम करताना झळकणार आहे. बऱ्याच काळानंतर अजय देवगणसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तो बऱ्याच चित्रपटांमध्ये माझ्यासाठी उत्तम सहकलाकार होता. एक अभिनेता म्हणून मी त्या प्रोजेक्टवर काम करण्यावर विश्वास ठेवते जे मला काही नवे शोधू देतील, असं ईशानं म्हटलं.

दरम्यान, 2012 मध्ये ईशानं बॉयफ्रेंड भरत तख्तानी सोबत लग्न केलं होतं. राध्या आणि मिराया अशी दोन मुलं ईशा आणि भरत यांना आहेत. ना तुम जानो ना हम, धूम, काल अशा एकूण 25 सिनेमांमध्ये ईशाने याआधी काम केलं होतं.

 

थोडक्यात बातम्या – 

“नागपूरचा विकास पहिल्या पावसात भिजून गेला”

“केंद्रातील मंत्रीच नाही तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”

बाॅलिवूडवर पून्हा शोककळा! हाॅरर चित्रपटांचे निर्माते कुमार रामसे यांचं निधन

‘शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते’; शिवसेनेच्या बड्या नेत्याची गर्जना

“सामाजिक स्पर्धा आणि माझी परीक्षा”; MPSC विद्यार्थिनीने लिहिलेला हा वास्तवदर्शी लेख नक्की वाचा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More