ते सगळ्यात मोठे गुंड; भर भाषणात हर्षवर्धन जाधवांच्या मैत्रिणीनं केलेल्या आरोपांनी खळबळ
औरंगाबाद | काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांंनी आपल्या मतदारसंघात एक सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांची सहकारी व मैत्रीण ईशा झा यांनी केलेल्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. “तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही राजकीय नेत्याकडे अजिबात जाऊ नका, कारण देशातील नेता हा सर्वात मोठा गुंड आहे” असं म्हणत त्यांनी मनातील गोष्ट बोलुन दाखवली आहे.
माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले पण, माझ्या कुटुंबाकडून मी हे शिकले की, काहीही अडचण आल्यास राजकीय नेत्याकडे अजिबात जायचं नाही. कारण हे सर्वात मोठे गुंड आहेत. खरंतर हे ऐकुन आश्चर्य वाटायचं, मात्र नंतर तसे अनुभव नंतर आल्याने या गोष्टीची खात्री झाली कारण बरेच नेते चौथी पास आहेत, आणि ते आपल्यावर राज्य करतात. असं ईशा यांनी बोलुन दाखवलं आहे. तसेच पुढे त्यांंनी हर्षवर्धन जाधव यांचं तोंडभरून कौतुकही केलं आहे.
आज आपल्या देशात डॉक्टर होण्यासाठी भरपुर अभ्यास केल्यानंतर डिग्री मिळते अशाप्रकारेच इंजिनीअर होण्यासाठी पण डिग्रीची आवश्कता भासते. परंतु, राजकारणात जाण्यासाठी कोणतीही शिक्षणासाठी अट नाही ही आपल्या देशाची शोकांतिका असल्याचंही त्यांनी बोलुन दाखवलं आहे.
आपल्याकडे लोकशाही आहे ते मला मान्य आहे पण लोकांनी योग्य उमेदवाराला निवडुन दिलं पाहीजे असं म्हणत त्यांनी हर्षवर्धन जाधव यांची स्तुती करत त्याचं शिक्षण लंडनहून झालं आहे. ते उच्चशिक्षित आहेत, तसेच प्रशासनातील मोठे अधिकारीही हर्षवर्धन बोलत असताना गप्प होतात कारण त्यांचा अभ्यास आणि बोलणं खुप मुद्देसुद असतं असंही त्या याप्रसंगी बोलत होत्या.
“बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर, पंछी को छाया नही, फल लागे अतिदूर” या संत कबीरांच्या दोह्याने त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. त्यांनी केलेल्या आरोपांनी चर्चांना उधाण आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर
“भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा”
‘ …तर आम्ही मदत करू शकतो’; न्यायालयानं बलात्काऱ्याला विचारलेल्या प्रश्नानं सगळेच हैराण!
Comments are closed.