दुबई | आयपीएल सुरु झाल्यापासून दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची कामगिरी उत्तम असल्याचं दिसून आलंय. मात्र 7 सामन्यांनंतर दिल्लीला मोठा धक्का बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या म्हणण्याप्रमाणे, इशांत शर्मा याच्या पाठीला दुखापत झाली असून 7 ऑक्टोबर रोजीच्या सराव सत्रात त्याने त्याला अधिक त्रास झाला.
दुखापतीवर उपचार करताना दुखापत गंभीर असल्याचं समजलंय. इशांतच्या तंदुरूस्तीसाठी सर्व प्रार्थना करत असून पण त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावं लागेल, असंही दिल्लीने स्पष्ट केलंय.
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”
“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”
…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून केलं ट्विट!
आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे- शरद पवार