Hardik Pandya | क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी घटस्फोट घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडिया पेजवर याबाबत पोस्ट टाकून माहिती दिली होती. घटस्फोट घेतल्यानंतर नताशा ही परत आपल्या मायदेशी मुलगा अगस्त्यला घेऊन परतली आहे. तर, हार्दिक आता सिंगल आयुष्य जगत आहे. अशात हार्दिकबद्दल (Hardik Pandya) आता वेगळ्याच चर्चा रंगत आहेत.
काही दिवसांपूर्वीच हार्दिकचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. या फोटोमुळे हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया (Jasmin Walia) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
अभिनेत्री इशिता राजचा मोठा खुलासा
तेव्हा हार्दिक पांड्याने शेअर केलेला व्हिडिओ आणि जास्मिनने पोस्ट केलेल्या फोटोतील दृश्य एकच असल्याचं दिसून आलं. त्यातच हार्दिकने जास्मिनच्या काही पोस्ट देखील लाइक केल्या होत्या. त्यामुळे नताशाला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिकचे नाव जास्मिन वालियासोबत जोडण्यात आले. अशात बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्यामुळे हार्दिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
View this post on Instagram
इतकंच नाही तर, या अभिनेत्रीने हार्दिकबद्दल मनात असलेल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री इशिता राज हिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हार्दिकबद्दल आपल्या भावना जगजाहीर केल्या आहेत. यामुळे हार्दिक आता चर्चेत आला आहे.
“हार्दिक पांड्यावर माझं प्रेम..”
मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली की, “हार्दित एक अष्टपैलू क्रिकेटर असून तो फलंदाजी करताना त्याला पाहणं एक उत्साह आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. खरंच तो माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. हार्दिक पांड्या माझा क्रश आहे आणि मला तो प्रचंड आवडतो.”, असं इशिता राज म्हणाली.
अभिनेत्री इशिता राज हिच्या या वक्तव्यामुळे हार्दिकबद्दल आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. इशिता राजबद्दल सांगायचे झाल्यास ती, दिग्दर्शक लव रंजन दिग्दर्शित ‘प्यार का पंचनामा’ सिनेमात दिसून आली आहे. तसेच, इतर अनेक सिनेमामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली आहे.
News Title : ishita raj open up her feelings about hardik pandya
महत्त्वाच्या बातम्या-
महिन्याच्या शेवटी दिलासा, सोन्याचे भाव उतरले; काय आहेत सध्या किमती?
मुंबईतली म्हाडाची घर तब्बल ‘इतक्या’ लाखांनी कमी होणार; फडणवीसांनी केली घोषणा
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात वाद, विकी म्हणाला, तिने मला…
त्या माय-लेकींनी टवाळखोरांना असं काही धुतलं की पुन्हा आयुष्यात …
“..पेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं”; अजित पवारांच्या जवळच्या नेत्याचं विधान, नेमकं काय घडलं?