देश

तिहेरी तलाकविरोधात लढणाऱ्या इशरतचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | तिहेरी तलाकविरोधात लढणाऱ्या इशरत जहाँने भाजपमध्ये प्रवेश केलाय. हावडा येथील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. भाजपच्या महिला आघाडीमध्ये ती काम करणार आहे. 

तिहेरी तलाकविरोधात याचिका दाखल करणाऱ्या 5 जणींपैकी इशरत एक आहे. 2014 साली दुबईतून फोन करुन तिच्या पत्नीने तिला तलाक दिला होता. 

दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपच्या महासचिव सायंतन बसू यांनी इशरतच्या भाजप प्रवेशाची माहिती दिली. तसेच्या तिच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे. 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या