बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सोशल मीडिया’द्वारे आयसिसमध्ये भरती करणारी महिला जेरबंद

फिलिपाईन्स | सोशल मीडियाद्वारे जगभरातून तरूणांना आयसिसमध्ये भरती करणाऱ्या कारेन आयेशा हमिदन या हस्तक महिलेला अटक केलीय. कारेननं भारतातही अनेक तरूणांचं ब्रेन वॉश केलं होतं.

हमिदन भारतीय वंशाची असून तिच्याबद्दलची माहिती फिलिपाईन्स तपास यंत्रणेला दिली होती. भारतासह सुमारे 12 देशांच्या तपास यंत्रणा तिच्या मागावर होत्या

दरम्यान, भारतीय तपास यंत्रणेनं आयसिसचे हस्तक असलेल्या दोघांना अटक केली होती. त्यावेळी दोघांनीही कारेनमुळेच आयसिसच्या संपर्कात आल्याची कबुली दिली होती.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More