बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इसिसचा तालिबान्यांना धोबीपछाड???, काबूलवर मोठे रॉकेट हल्ले; पाहा व्हिडीओ

मुंबई | तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर आता तालिबान आणि अमेरिकेमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळत आहे. इस्लामिक स्टेट ऑफ खोरोसन प्रॉव्हन्स या दहशदवादी गटाने गेल्या काही दिवसात तालिबानमध्ये स्फोट घडवून आणले आहेत. त्यातच आता काबूलमधून मोठी बातमी समोर आली आहे.

काही वेळापुर्वीच अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठे राॅकेट हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. काबूलच्या खैर खाना या भागात राॅकेट हल्ले झाल्याची माहिती स्थानिक वृत्त संस्थेनी दिलं आहे. राॅकेट हल्ले झाल्यानंतर तेथील काही भागात आग लागल्याची देखील माहिती समोर आली आहे.

काबूलवर झालेला हा हल्ला मोठा असला तरी अद्याप कोणत्याही दहशदवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. गेल्या काही दिवसांपासून इसिसने काबूलवर मोठे हल्ले केले आहेत. त्यामुळे हा हल्ला देखील इसिसने केला असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, तालिबानने आपल्या नव्या सरकारची घोषणा केली आहे. तालिबानी नेता आणि पंतप्रधानपदी निवड झालेला मुल्ला मोहम्मद हसन अखुंड यांच्या मंत्रिमंडळात एकूण 36 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दूस सलाम या तालिबान नेत्यांकडे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

लोकसभा निवडणुकीआधी मोदी-गडकरींचा मेगा प्लॅन, तब्बल ‘इतके’ प्रकल्प हाती घेणार!

जागतिक बँकेचा तालिबानला दणका! बँकेच्या ‘त्या’ निर्णयामुळे तालिबान्यांचं झालंय अवघड

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

“शिवसेनेला वाचवायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या बाहेर पडायला हवं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More