देश

कोरोनापासून वाचण्यासाठी भारतीयांची ‘ती’ पद्धत वापरा; इस्राईलच्या पंतप्रधानांचा सल्ला

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण असून यात 3 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाय केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एक सल्ला दिला आहे.

एखाद्या व्यक्तीला भेटताना हात मिळवण्यापेक्षा भारतीय पद्धतीने नमस्कार करावा, असा सल्ला नेतन्याहू यांनी इस्राईली नागरिकांना दिला आहे. नेतन्याहू यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी छोटे छोटे उपाय सांगितले आहेत.

इस्राईलच्या भारतीय दूतावासाने नेतन्याहू यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यातून नेतन्याहू यांनी इस्राईली नागरिकांना संबोधित करताना नमस्कार करण्याच्या भारतीय पद्धतीचा उल्लेख केल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी जगभरात पाऊलं उचलले जात आहेत. अनेक देशांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. भारतातही यासाठी खबरदारी घेण्यात येत असून आतापर्यंत 29 कोरोना बाधित देशात आढळल्याची माहिती आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

पुढची 5-10 वर्ष अशीच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहित राहा- उद्धव ठाकरे

काय साहेब?, लोक मुर्ख वाटले का?; विशाल दादलानीने भाजपला फटकारलं

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंनी अयोध्येऐवजी मक्केला जावं”

मुख्यमंत्र्यांना न विचारताच राष्ट्रवादीचे मंत्री निर्णय घेतात का?; भाजपचा सवाल

भाजप खासदाराची खासदारकी जाणार? न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या