देश

‘या’ कारणामुळे देशभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली | ओरिसातील किनारपट्टीवरील धडकलेल्या फनी चक्रीवादळात हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात इस्त्रोने मोलाची कामगिरी पार पाडली आहे. फनी चक्रीवादळाचा अंदाज इस्त्रोला आला होता. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. कारणामुळे देशभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वादळाची माहिती मिळाल्याने स्थानिक प्रशासन, ओरिसा सरकार आणि केंद्र सरकारने संपूर्ण खबरदारी घेतली होती. त्यामुळे आज मोठी हानी टाळता आली.

फनी चक्रीवादळाची माहिती मिळताच आठवड्याभापासून इस्त्रोचे 5 सॅटलाईट या वादळाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. वादळाची माहिती मिळाताच लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या संपतीचे रक्षणही झाले.

दरम्यान, वादळाबाबतची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्यामुळे या संकटाला सामोरं जाण्यासाठी एनडीआरएफची 80 हून अधिक पथकं तैनात करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

-माझ्यावर होणारे हल्ले भाजपने घडवून आणले- अरविंद केजरीवाल

-ममता बॅनर्जींची पंतप्रधान मोदींचा फोन घेण्यास टाळाटाळ!

-लढाई संपली आहे, तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय; राहुल गांधींचा मोदींना टोला

-कंगणा राणावत, विवेक ओबेराय, गजेंद्र चौहान यांचा मोदींना जाहीर पाठिंबा!

-मनसे दिवसरात्र लोकशाहीच्या कोरड्या बाता मारते मग स्वत:वरची टीका का सहन होत नाही- भाजप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या