बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांंत पाटलांची अवस्था ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी झालीय”

मुंबई |  गेल्या काही दिवसांपासून अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा असा वाद पेटल्याचं चित्र महाराष्ट्रभरात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशा वादामध्ये आता दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी अजित पवार कधीही सोडत नाहीत. आता पुन्हा अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याची जीएसटीची रक्कम दिली असताना राज्य शासनाने ओरड करू नये, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर आता अजित पवार यांनी खोचक टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांचं हे म्हणणं अज्ञानातून आलेलं आहे. त्यांना वास्तवातील आकडेवारी माहीत नसल्यानं ते काहीही बोलतात. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी त्यांची अवस्था झाली आहे, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीत सहभागी तीनही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढतील. याबाबतचा अंतिम निर्णय हा या तीनही पक्षाचे वरिष्ठ नेतेच एकत्रितपणे घेतील, असं अजित पवार म्हणाले.

पंतप्रधानांसोबत  झालेल्या बैठकीवेळी आम्ही पाठपुरावा केला आहे. केंद्र शासनाकडून राज्याला अद्याप 23 हजार कोटी रुपयांचा जीएसटीचा परतावा मिळणे बाकी आहे, असं देखील अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या टीकेला चंद्रकांत पाटील काय उत्तर देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पवित्र रिश्ता-2’ मध्ये सुशांतच्या जागी दिसणार ‘हा’ अभिनेता

सावधान! लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात मोनोक्लोनल अँटिबॉडीची यशस्वी ट्रिटमेंट

मंत्री बच्चू कडू यांच्या यूट्यूब चॅनेलला मिळाले मानाचे सिल्व्हर प्ले बटन

धक्कादायक! कुंभमेळ्यात तब्बल एवढे लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More