Top News देश

“कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही”

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच कोरोनाची लस बनवण्यासाठी देशाते शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र अशातच जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी एक वक्तव्य केलं आहे.

कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नसल्याचं टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ते बोलत होते.

कोरोनाच्या काळात आपण माणसांची चांगली रूप पाहिली आहेत. त्यासोबत त्यांची वाईट रूपही आपण पाहिली आहेत. महामारी संपत आली पण काही गरीबी, भूक आणि असमानतेमध्ये परिवर्तन झालं नसल्याचं टेंड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये, असंही टेंड्रोस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण!

पुण्यापासून जवळ असलेल्या ‘या’ भागात उद्यापासून संचारबंदी

लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत…- राजेश टोपे

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालांनंतर फडणवीसांचं सत्तास्थापनेबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले…

दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून रवींद्र जडेजा बाहेर; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या