बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये”

बुलडाणा | सध्या राज्यभरात ईडीच्या कारवाई आणि त्यांच्या नोटीस जरा जास्त प्रमाणात होत असलेले पाहायला मिळत आहेत. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला आहे.

जो भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते. ही भारतामध्ये आता फॅशन झाली आहे. ज्याप्रकारे पोस्टातून पत्र येतात, त्याचप्रकारे आता ईडीतून नोटिसा यायाला लागण्या आहेत. हे सर्व दुर्दैवी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुलडाण्यातील एका कार्यक्रमामध्ये केली आहे.

बुलडाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलेला पाहायला मिळालं. सध्या त्यांनी केलेल्या वक्तव्याची राजकिय वर्तुळात चर्चा सुरु झालेली दिसत आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या बुलडाण्यातील स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“हिम्मत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा”

पुण्यातील भाजप आमदाराचा प्रताप; महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

भायखळा तुरुंगात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव; ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

…म्हणून स्नेहा दुबे यांनी न्यूज अॅंकर अंजना कश्यपला बाहेरचा रस्ता दाखवला!

‘नरेंद्र मोदी माझ्यावर जळतात’; ममता बॅनर्जी संतापल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More