मोठी बातमी! शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत
मुंबई | शिंदे सरकारने बहुमतचाचणी जिंकली. यानंतर गुरूवारी शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला. अजून खाते वाटप होणं बाकी आहे. आता कोणतं खातं कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे.
काल एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरा दोन वाजता संपली. तब्बल चार तास या तिघांमध्ये चर्चा सुरू होती. या बैठकीमध्ये 11 जुलैची सुनावणी आणि खातेवाटपासंदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद (Home Minister) त्यांच्याकडे होतं. आताही गृहमंत्रीपद फडणवीसांना मिळणार अशी चर्चा सुरू होती. आता मात्र गृहमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रकांत पाटील हे सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून खाते वाटप करण्यात येणार आहेत.
शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. ते आज राष्ट्रपतीचीही भेट घेतील. आता पंतप्रधानांशी शिंदे काय चर्चा करणार आहेत नेमकं कोणतं मंत्रीपद कोणाला मिळणार हे मोदिंच्या भेटीनंतर निश्चित होईल असं वाटत आहे. नव्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सोमवार उजाडण्याची शक्यता आहे.
थो़डक्यात बातम्या
राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; अति मुसळधार पावसाची शक्यता
आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा लेकाच्या पक्षाला रामराम
शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“शिवसेना पुन्हा कधीच उभी रहाणार नाही, शिवसेनेेची आजची अवस्था ठाकरे पिता-पुत्रामुळेच”
अमरनाथ ढगफुटीतील मृतांचा आकडा वाढला, महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.