बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसेचा अजेंडा काय? राज ठाकरे म्हणतात, “सध्या आघाडीचे दिवस पण…”

औरंगाबाद | राज्यातील विधानपरिषद (MLC Election) निवडणुकांचे निकाल (Results) हाती आले आहेत. महाविकास आघाडी (MVA Government) आणि भाजपमध्ये (BJP) झालेल्या या लढतीत भाजपनं बाजी मारली आहे. आता राज्याला आगामी काळातील महत्त्वाच्या महापालिका (Municipal Corporations) निवडणुकांचे वेध लागलं आहे. सर्व पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS President Raj Thakeray) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट झाली होती. त्यांनतर राज  ठाकरे यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. अशातच येणाऱ्या निवडणुकीत राज ठाकरे भाजपसोबत युती करणार अशी चर्चा रंगली आहे. माझ्याकडं काय पर्याय आहेत, कोणासोबत युती करणार हे मला आत्ताच सांगायचं नाही, असं वक्तव्य राज यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांनी आगामी काळात कोणासोबत युती करणार यावर काहीही स्पष्ट सांगण्यास नकार दिला आहे. परिणामी अद्यापी राज ठाकरे भाजसोबत युतीबाबत ठोस भूमिकेत दिसत नाहीत. सध्यातरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. परिणामी मला सध्यातरी आघाडी किंवा युतीबाबत बोलायचं नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. परिणामी त्यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील सभेतील भाषणावर राज यांनी आपलं मतं व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘हा तर घोडेबाजार’; नागपूरातील पराभवानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

MLC Election: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळे यांना अश्रू अनावर

‘रडीचा डाव खेळू नका, आता… ‘; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

‘विनोदवीर नाना पटोलेंचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झालंय’; भाजपचा हल्लाबोल

“बावनकुळेंचा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More