बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींंचा भाऊ सांगत बाप-लेक करायचे ‘हे’ धक्कादायक कृत्य

मुंबई | देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भाऊ असं सांगत मुुंबईतील पिता-पुत्रांनी अनेक लोकांना गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पिता-पुत्रांना पोलिसांनी अटक केली आहे. राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी असं पिता-पुत्रांचं नाव आहे. नोकरीचं अमिष दाखवत स्वस्त दरात सोनं देतो असं सांगत अनेक लोकांची फसवणूक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राजन गडकरींच्या सुनेने या प्रकाराबाबत माहिती दिली.

माझे भाऊ नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत. तुम्हाला नोकरी लावतो, स्वस्तात सोने खरेदी करून देतो म्हणत डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या अनेक जणांकडून राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी यांनी लाखो रूपये घेतले पण कुणालाच नोकरी लागली नाही किंवा सोने मिळालं नाही.

लोकांना समजलं की त्यांची फसवणूक होत आहे त्यानंतर त्यांनी या पिता-पुत्रांकडे पैशासाठी तगादा लावला. राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी, राजनची पत्नी आणि आनंदच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन पळून गेले. मात्र आनंदची पत्नी गीतांजलीला त्यांनी सोबत नेलं नाही. सून गीतांजलीने गडकरीने आपल्या मुलाला पळवून नेल्याची पोलिसात तकार देत सर्व प्रकरणाबाबत भांडाफोड केली.

दरम्यान, या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी फसवणूक झालेल्या अमोल पलसमकर यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. गीतांजलीच्या कबुली जबाबानुसार ती माफीची साक्षीदार झाली आणि सासरे आणि पतीचे सगळे कटकारस्थान पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी  पिता-पुत्राला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे.

थोडक्यात बातम्यात – 

धक्कादायक! दोन लहान मुलांसह सगळ्या कुटंबाला डंपरने चिरडलं, काळीज घट्ट करून पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या या भारतीय लस कंपनीला मोठा झटका, लसीच्या आतप्कालीन वापरासाठी अमेरिकेचा नकार

अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ कारणामुळे पाच वर्षाच्या मुलाला मातीत पुरलं अन्….

भारतीय संघात निवड होणारा पिंपरी-चिंचवडचा ‘हा’ पहिलाच क्रिकेटपटू

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला धमकी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More