बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना संपवणं हेच भाजपच धोरण”

मुंबई | 2019 ला भाजप(BJP) आणि शिवसेनेची(shivsena) युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात सतत टोलेबाजी सुरू असते. त्यातच एकीकडे महाराष्ट्रात भाजपने सत्ता स्थापन केली आणि बिहारमध्ये भाजपची सत्ता गेली. त्यावरून आता उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) भाजपवर हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना संपवण्याचं भाजपचं धोरण मला 2019 ला समजलं होतं. त्यामुळे मी वेगळा झालो. जे मला 2019 ला कळलं ते आता नितीश कुमारांना(Nitish Kumar) कळलं, अशा शब्दात ठाकरेंनी नितीश कुमारांच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक शुक्रवारी पार पडली, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बिहारमधील झालेल्या राजकारणावर भाष्य केलं.

तसेच ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणूकीत विजयाचा दावा केला. जे आमदार , खासदार शिवसेना सोडून शिंदेंसोबत गेले ते निवडूण येऊच शकत नाहीत. गेल्या निवडणुकीत आपण भाजप विरोधात लढलो आणि जिंकलो. त्यामुळे यावेळीही आपणच जिंकू, असं ठाकरे या बैठकीत म्हणाले. तसेच शिंदे गटाला महत्व न देता आपली लढाई ही भाजपशी असल्याचंही ठाकरेंनी या बैठकीत सांगितले.

दरम्यान, ठाकरेंनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदा टीका केली. ठाकरे म्हणाले, मंत्रिमंडळाबाबत नाराजीचा सूर तर आहेच पण ज्यांना आत्मविश्वास वाटत होता, त्यांना देखील माघार घ्यावी लागत आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे आमदार बच्चू कडू(Bacchu kadu) यांना टोला लगावला.

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती

“…मग मी पण म्हणायचं का शिवसेना माझी आहे?”

‘बाबा नेहमी म्हणायचे राजकारण करायचं तर…’; पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

‘आता डबल इंजिनचं सरकार आहे, त्यामुळे…’; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

‘बंड करताना शहीद होण्याचा धोका होता’, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More