ईडी कोर्टाने नोंदवलेल्या ‘या’ निरीक्षणामुळे एकनाथ खडसेंचं टेंशन वाढलं!
मुंबई | फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता.
रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी ईडी कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असं कोर्टाने सांगितलं.
दरम्यान, भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना 6 जुलै 2021 रोजी अटक करण्यात आली होती. 13 तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. चौधरींना दोन महिन्यांनंतरही जामीन मिळालेला नाही. त्याचवेळी खडसेंनाही अटक होण्याची शकत्या वर्तवण्यात येत होती.
थोडक्यात बातम्या-
“ब्राह्मणांचा कायमच वापर झाला, शिवाजी महाराज सुद्धा ब्राह्मणच होते”
‘…अन् 100 प्रवाशांनी भरलेली बोट क्षणात आडवी झाली’; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहे – धनंजय मुंडे
अफगाणिस्तानमध्ये ‘या’ गोष्टीसाठीही घ्यावी लागणार परवानगी; ‘हे’ नियम ऐकून थक्क व्हाल
एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते- ईडी कोर्ट
Comments are closed.