बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोविशिल्ड’ लस घेतलेल्या भारतीयांना ‘या’ देशात जाण्यास अडचणी, पुनावाला म्हणाले….

नवी दिल्ली | सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अनेक नागरिकांना कोविशिल्ड लसीचे डोस मिळाले आहेत. मात्र अनेक देशांनी अद्यापी कोविशिल्ड लसीला मान्यता न दिल्याने परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या भारतीयांना अडचण निर्माण झाली आहे.

कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपियन युनियनमधील देशांमध्ये जाण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. युरोपियन युनियनने कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कोविशिल्ड घेतलेल्यांचे युरोपियन देशात जाण्याचे मार्गच बंद झाले आहेत.

काही दिवसापूर्वी याच संघाने कोणतीही लस दिली गेली असली तरी वॅक्सिन पासपोर्ट द्यावा अशी शिफारस केली होती. मात्र आता काही तांत्रिक कारणाने युरोपीय संघ सदस्य देशांनी मान्यता दिलेल्या लसी साठीच असे पासपोर्ट देता येतील असे म्हटले आहे. या देशात सध्या फक्त चार लसीना परवानगी आहे. त्यात फायझर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेका आणि जॉन्सन या लसींचा समावेश आहे.

दरम्यान, मला जाणीव आहे की, कोविशिल्ड लस घेतलेल्या असंख्य भारतीयांना युरोपियन देशात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी सर्वांना ग्वाही देतो की, हा मुद्दा मी उच्च स्तरावर मांडला आहे. आशा आहे की, हा मुद्दा लवकरच निकाली निघेल, नियामक आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर मार्ग निघेल, असं लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

‘कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन डोस घ्या अन्यथा…’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला इशारा

सर्वांची आवडती ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज

निर्वासित मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 31 जुलैपर्यंत ‘वन नेशन वन रेशन’ योजना लागू करा!

इस्ज्ञायल दूतावासाने मराठीतून ट्वीट करत ‘या’साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केलं अभिनंदन

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More